आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा /सिंदखेडराजा: आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदीप बिल्होरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमांमध्ये धार्मिक व सामाजिक प्रबोधन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, साहित्य, कला आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात आले.
डोणगाव व लोणार येथे ह.भ.प. इंदुरीकर महाराज, तर देऊळगाव कुंडपाळ येथे ह.भ.प. सोपान शास्त्री महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून आध्यात्मिकतेसोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
आरोग्याच्या क्षेत्रात महाआरोग्य योगदान शिबिर घेण्यात आले. नागरिकांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फळवाटप व पेढेवाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्यांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्यात आला.
युवकांसाठी मॅरेथॉन व बारी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या व्याख्यानातून शिक्षण, संघर्ष आणि ध्येयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नितीनजी चंदनशिवे यांच्या व्याख्यानातून सामाजिक व वैचारिक प्रबोधन करण्यात आले.
रोजगार मेळाव्यात सुमारे २ हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात ‘साहित्यिकांची मांदियाळी’, ‘रफी की यादें’ गायन स्पर्धा आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले.
विविध उपक्रमांमुळे वाढदिवसाचा कार्यक्रम सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि रोजगाराभिमुख उपक्रमांशी जोडला गेला. या उपक्रमांमध्ये



