भाजपा महिला मोर्चा तर्फे रक्षाबंधनाचा उत्सव साजरा

छोटे व्यासायिक व फेरीवाल्यांना बांधल्या राखी
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि
रामा इंदोरे
खामगाव::- भाजपा महिला मोर्चाच्या वतीने शहरातील छोटे व्यावसायिक व फेरीवाल्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.
भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांच्या निर्देशानुसार तसेच आ. अँड .आकशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात खामगाव शहरातील छोटे व्यावसायिक बंधु, ऑटो चालक,भाजीपाला, फळ विक्रेते,चहा विक्रेते, फेरीवाले, व विविध छोटे व्यावसायिक बंधु यांना भाजपा महिला मोर्चाच्या भगिनींनी औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला.विशेष म्हणजे फळ व भाजीपाला विकणारे मुस्लिम बांधवांनी सुध्दा आनंदाने आनंदाने राखी बांधून घेतली. या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. अनिता देशपांडे, माजी नगर सेविका सौ. शिवानी शेखर कुलकर्णी, सौ. भाग्यश्री विक्रम मानकर, कार्यकारिणी सदस्य सौ. शिवानी सचिन कुलकर्णी तसेच महिला मोर्चा सदस्य तसेच बेटी बचाव अभियानाचे जिल्हा समिती सदस्य ॲड. श्री अभय जी मुंडे, श्री. ओम जी खंडेलवाल तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



