महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरातील मुस्लिम बांधवांचे कब्रिस्तान बाबतच्या समस्या त्वरित दूर व्हाव्यात*

*तेल्हारा शहरातील मुस्लिम बांधवांचे कब्रिस्तान बाबतच्या समस्या त्वरित दूर व्हाव्यात*

*प्रहार युवक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे व समस्त मुस्लिम बांधव यांच्या नेतृत्वात न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी व्ही एम घोडेतेल्हारा दि.१८. तेल्हारा शहरातील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तान च्या बाबतीत अनेक समस्या आहेत या समस्यांचं निराकरण व्हावं या करिता आज दि.१८अगष्ट २०२३शुक्रवार रोजी तेल्हारा न.प. मुख्याधिकारी सतीश गावंडे यांना प्रहार जनशक्ती पक्ष युवक आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात तेल्हारा शहरातील मुस्लिम कब्रस्तान मधील विविध जीवघेण्या समस्येचे निराकरण करणे बाबत तसेच विशेष मुख्य रस्त्याचे काम त्वरित करणे बाबत प्रहार जनशक्ती पक्ष व समस्त मुस्लिम बांधवांनी निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने नमूद मुद्दे पुढीलप्रमाणे १) मुस्लिम कब्रिस्तान मध्ये जाण्याच्या रस्त्याची व्यवस्था करणे बाबत.२) कब्रिस्तान मध्ये विजेचे लाईट बसवणे बाबत.३) शोकाकुल व्यक्तींना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बाबत. ४) कब्रिस्तान मधील साफसफाईकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष.(गवत ,गांजर गवत इतर साफाई करणे बाबत) ५) सरपटणाऱ्या विषारी जीवघेण्या प्राण्यांपासून शोकाकुल व्यक्तींना जीवीतहाणी होण्याची भीती असल्यामुळें त्याबाबत उपाययोजना करणे बाबत. अशा स्वरूपाच्या समस्या निवेदनात नमूद केल्या आहेत या निवेदनावरील समस्याचे निराकरण येत्या ७ दिवसाच्या आत करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी निवेदनावर प्रहार युवक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे,निसार शहा ,हुसेन शहा ,सलीम शहा पहेलवान ,शेखर भुजबले ,मतीन शहा ,दर्शन भिसे ,शेख अमीन ,शेख नईम ,शेख रहमान ,नासिर शाह ,मो. शेख शेख अहमद ,शेख इस्माईल ,अशपाक शहा ,यांच्या सहआदींच्या सह्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button