तेल्हारा प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामध्ये रक्षाबंधन निमित्त. ..

तेल्हारा प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामध्ये रक्षाबंधन निमित्त. ..
(नात्यामधील पवित्रतेची आठवण म्हणजे रक्षाबंधन- ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी.)
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
तेल्हारा दि.२८:- आपल्या तेल्हारा शहरांमध्ये साई मंदिर रोड धान्य बाजार लगत असलेले प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा येथे दरवर्षी रक्षाबंधन या बहिण भावाच्या पवित्र सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते सालाबाद प्रमाणे याही वर्षी 28 ऑगस्ट सोमवार रोजी अकोला वाशीम ब्रह्माकुमारीज परिवाराच्या मुख्य मार्गदर्शिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी व सुमन दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत व तेल्हारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली राखबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रुख्मिनी दीदींनी उपस्थिताना रक्षाबंधन या धार्मिक उत्साहाचे आध्यत्मिक महत्व सांगितले.मनुष्य जीवनातील नात्यांमधील पवित्रतेची आठवण करून देणारा उत्सव म्हणजे रक्षाबंधन.बहीण भावातील अतूट आणि सर्वात निर्मळ पवित्र नातं आहे या नात्यातील पवित्रता व्यक्त करण्यासाठी राखी बांधण्याचा प्रघात समाजात आहे परंतु प्रत्येक मनुष्य आत्म्याने परमात्म्याशी असलेल्या आत्मिक नात्याची ओळख राजयोगच्या माध्यमातून समजून घेऊन ईश्वरीय परिवारातील पवित्र नाते कायम स्मुर्तीत ठेवून विश्वकल्याणच्या कार्यात श्रेष्ठ सहयोग द्यावा असे आवाहन रुख्मिणी दीदींनी केले. सुमन दीदींनी सुद्धा स्वपरिवर्तन से विश्वपरिवर्तन या प्रमाणे सर्वांनी ब्रह्माकुमारीज च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिकवनीला आत्मसात करून विश्वकल्याण करण्यासाठी यथाशक्ती सहकार्य करावे. प्रमिला दीदींनी अतिशय व्यवस्थित नियोजन करून सर्वांनी रक्षाबंधन निमित्त उपस्थित राहाल्याबद्दल मनःपुर्वक आभार मानले. ब्रह्माकुमारी रुख्मिणी दीदी, सुमन दीदी, प्रमिला दीदी, स्नेहल दीदी, ब्रह्माकुमार श्याम भाई यांच्या सह पत्रकार, शिक्षक/ शिक्षिका व व्यापारी इत्यादी सह विद्यालयाचे ज्ञानार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



