खानदेशजळगावा जिल्हा

वनविभागाच्या अधिकाऱ्यांची हिटलर गिरी आदिवासी तरुणाने केली आत्महत्या भूमी मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रमोद पोहेकर यांचा आंदोलनाचा इशारा मुक्ताईनगर तहसीलदारांना दिली निवेदन:- (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रमोद सौंदळ)

सविस्तर वृत्त असे की मौजे मोरझिरा पावरी वाडा तालुका मुक्ताईनगर येथील रहिवासी परसराम आणि इतर 33 वन जमीन अतिक्रमण धारक अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 नेम 2008 व सुधारणा नियम 2012 अंतर्गत वैयक्तिक वंदावे व सामुदायिक वन दावा हक्क दावा प्रलंबित असताना देखील वनविभाग व मौजे मोरझिरा येथील ग्रामस्थ यांनी मिळून वरील अतिक्रमण धारक यांच्या अतिक्रमण प्रलंबित वन जमीन वनविभागाच्या मदतीने हातात तोंडाशी आलेले पीक मका मूग उडीद सोयाबीन अशी सर्व पिके मेंढपाळांना सांगून उध्वस्त करण्याच्या सूचना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिल्या त्यावेळेस तिथं कोळपणी करणाऱ्या आदिवासी पावरा समाजातील शेतकरी महिलांनी विरोध केला असता त्यांना सुद्धा मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली त्यामुळे भयभीत झालेले आदिवासी बांधव संघटनेची व पोलिसांची मदत मिळावी म्हणून मुक्ताईनगरला आलेले होते त्यापैकी परसराम गुलाब पावरा यांचा मुलगा नामे दिदल्या परसराम पावरा हा वन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शेतीचे नुकसान करून महिलांना मारहाण केल्यामुळे हतबल होऊन नैराश्यापोटी मुक्ताईनगर येथून सरळ पाचोरा या ठिकाणी नातेवाईकांकडे जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भूमिमुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पोहेकर यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते तसेच तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिलेला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button