खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगर नगराध्यक्षपदी संजना ताई पाटील शिवसेनेचा शिक्का कायम

मुक्ताईनगर । प्रतिनिधी

मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांनी स्पष्ट बहुमत मिळवत नगरपंचायतीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत संजना चंद्रकांत पाटील यांनी २४३६ मतांनी विजय मिळवला. संजना पाटील यांना ८,९२२ मते मिळाली, तर भाजप समर्थित उमेदवार भावना ललित महाजन यांना ६,४८६ मते मिळाली. निवडणुकीत ४९१ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. संपूर्ण मतदान १५६६४ झाले.

  • नगरसेवक पदावर शिवसेनेची आघाडी १७ प्रभागांच्या नगरपंचायतीत शिवसेनेने १० नगरसेवक पदे जिंकत नगराध्यक्षपदासह एकूण ११ जागांवर विजय मिळवला. भाजपला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर ३ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. भाजपचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला मानला जाणारा मुक्ताईनगर यावेळी ढासळल्याचे चित्र दिसून आले. निकाल

जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर IM शहरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष TK साजरा केला. संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण

पसरले होते.

निवडणूक प्रचारादरम्यान महसूल मंत्री एकनाथराव खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्यावर गुंडगिरी व घराणेशाहीचे आरोप केले होते. मात्र, निकाल पाहता मतदारांनी हे आरोप फेटाळून लावत शिवसेनेच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. भावना महाजन यांचा पराभव हा खडसे कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button