खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जळगाव रायसोनी नगरमधील रस्ते व गटारींचे

*जळगाव रायसोनी नगरमधील रस्ते व गटारींचे गौडबंगाल..!!!*जुलै महिन्यात रायसोनी नरमधील स्थानिकांनी त्रस्त होऊन रस्ते आणि गटारी निर्माणसाठी एक चळवळ सुरू केली. सर्वजण एकत्र येऊन चार ते पाच बैठकांचे चर्चासत्र संपन्न झाले. त्यासाठी रायसोनी नगर एकता गृप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली. त्यासाठी जळगाव जागृत जनमंचचे प्रती अण्णा हजारे अर्थात श्री शिवराम पाटील साहेब व त्यांच्या टीमला पाचारण करण्यात आले कारण त्याशिवाय दुसरा ठोस पर्याय समोर दिसत नव्हता. त्यासाठी चळवळीच्या नेतृत्वाच्या निमित्ताने श्री कुंदन देसले सरांनी सर्व धूरा सांभाळली. त्यांच्या सोबत सर्वांनी सहभाग नोंदविला व एकदाची ही चळवळ प्रत्यक्षात सुरू झाली. त्यासाठी श्री शिवराम पाटील साहेबांना बऱ्याचदा गळा फाडून ओरडावे लागले. कारण त्याशिवाय झोपलेल्या जनप्रतिनिधींना व नेतेमंडळींना झोपेतून जागृत करणे शक्य नव्हते. त्यासाठी त्यांना बरेच लेख व क्लिप्स व्हायरल कराव्या लागल्या. त्यानंतर नगरसेवक, महापौर, आमदार, कंत्राटदार, वर्तमान पत्रे ही सर्व यंत्रणा समोर आली आणि एकदाचे काम सुरू झाले. पण हे सर्व घडत असतानाच काही तथ्य व सत्य समोर आलीत त्यांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत व त्यांची पुर्ण माहिती आतापर्यंत संविधानीक पद्धतीने जनतेसमोर कोणीही उजागर करीत नाहीत. त्यासाठी वेळोवेळी भिन्न जनप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे व प्रतिक्रिया अर्थातच ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टेटमेंट म्हणतो ते समोर येत आहेत. सुरुवातीला एक नगरसेवक महाशय आले त्यांनी रस्ते निर्माण साठी स्टेटमेंट दिलेकी साईरंग गौरी अपार्टमेंट समोरील रस्ता मंजूर झालेला आहे. निधी संदर्भातील आकडा दोन कोटी…! त्यानंतर एक उडतराव उडत उडत आले…धावती भेट देत तीन रस्ते मंजूर आहेत अशी माहिती व त्यासोबत दलित निधी आकडा तीन कोटी मंजूर अशी माहिती दिली. एक जनप्रतिनिधी आले त्यांनी मोहाडी रोडला टच करणारे तीन रस्ते बनवून देतो असं सांगून चालले गेले सोबत जनतेकडून फुलगुच्छ सोबत घेऊन गेले. आता काही दिवसांपूर्वी महापौर आले त्यांनी पवन हाईटस समोरील रस्ता मंजूर आहे व त्यासाठी नवीन निधी आला आहे असे स्टेटमेंट सर्वांसमक्ष दिले. एकंदरीत सर्व वृत्तांत पाहिला तर असं लक्षात येतं की संपूर्ण परिसरातील अवघ्या तीन ते चार किलोमीटरच्या रस्त्यांची पूर्ण मंजूरी मिळाली आहे अशी माहिती कोणत्याही जनप्रतिनिधींने दिली नाही. परंतु तुकडे तुकडे करून सर्वांच्याच स्टेटमेंट वर बारकाईने नजर मारली तर सर्वच रस्ते मंजूर आहेत अशी सत्यता समोर येते. तरी नेमकं काय गौडबंगाल आहे याची खरी कागदोपत्री माहिती एकदा समोर जाऊन आयुक्तांना भेटून सर्वांनी घेणं आवश्यक आहे. नाहीतर हिंदीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे चोर चोर मौसेरे भाई…अशी एकंदरीत वस्तुस्थिती समोर येत आहे…..

सुनिल गायकवाड रायसोनीनगर, जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button