चिवरा येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतरत्र हलविण्यास विरोधपरिसरातील ग्रामस्थांनी केला रास्ता रोकोनांदेड अकोला महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प

चिवरा येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतरत्र हलविण्यास विरोधपरिसरातील ग्रामस्थांनी केला रास्ता रोकोनांदेड अकोला महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प *वाशिम जिल्हा प्रतिनिधी* *अजय गायकवाड* मालेगाव ता 22: – चिवरा येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतरत्र हलविण्यास परिसरातील ग्रामस्थांनी नांदेड अकोला महामार्गावरील संन्मति इंजिनिअरिंग कॉलेज जवळ रास्ता रोको आज ता 22 रोजी सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान करण्यात आला यामुळे वाहतूक एक तास ठप्प झाली होती यावेळी मालेगाव च्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आलेनिवेदनात म्हटले आहे की मालेगाव तालुक्यातील ग्राम चिवरा येथे नुकतेच शासकीय ई-क्लास जमीनीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजुर करण्याबाबत शासन निर्णय झालेला असुन या अनुशंगाने खाटांची संख्या विद्यार्थी संख्या व इतर बाबी तपशीलवार पणे शासकीय परिपत्रकात नमुद करण्यात आल्या होत्या.असे असतांना मागील काही दिवसापासुन वृत्तपत्र व समाजमाध्यामाव्दारे चिवरा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे राजकीय भावनेतुन जिल्हातील इतर ठिकाणी हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत व बातम्या प्रसिध्द होत आहे. त्यामुळे मालेगाव, रिसोड व वाशिम तालुक्यातील बहुसंख्य रहीवासी यांचेमध्ये तिव्र संताप असुन मंजुर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय अन्य ठिकाणी हलविल्याच्या हालचालीचा निषेध करण्यासाठी चिवरा ग्रामवासी व मालेगाव, वाशिम तालुक्यातील अन्य रहीवासी हे आज ता.22 रोजी सन्मती इंजि.कॉलेज समोर प्रस्तावीत शासकिय. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे लोकशाही व सनदशीर मार्गाने रास्तारोको आंदोलन करणार आले. या आंदोलनाच्या माध्यमातुन मागणी शासनापर्यंत पोहचविण्याचे उद्देशाने केवळ हे आंदोलन करण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहेया निवेदनाच्या प्रतिलीपी जिल्हा विशेष शाखा, जिल्हाधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना पाठविल्या आहेतनिवेदनावर डॉ राधाकिसन क्षीरसागर गोपाल शिरसागर आदींच्या सह्या आहेत.



