एका वेळेत सर्व निराधारांना मासिक अनुदान मिळावे..

*एका वेळेत सर्व निराधारांना मासिक अनुदान मिळावे..
*तालुकाध्यक्ष संदीप ताथोड यांची मागणी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी-व्ही एम घोडे.तेल्हारा.दि 10. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, महिला परितक्त्या,दिव्यांग अशा प्रकारच्या निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत म्हणून हे अनुदान लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जाते ही बाब प्रशंसनीय आहे मात्र हल्लीच्या काळात या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांना हे मासिक अनुदान मागे-पुढे वितरित होत आहे या कारणाने लाभार्थ्यांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेक तक्रारी ही आलेल्या आहेत मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचा बदलाव होताना दिसत नाही हि समस्या जाणून घेतल्या वर या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांना एका वेळेत त्यांच्या बँक खात्यात अनुदान मिळावे या विचाराने प्रेरित होऊन प्रहार दिव्यांग क्रांती संस्था तालुकाध्यक्ष संदीप गजानन ताथोड यांनी प्रहार चे जेष्ठ नेते श्री राजेशभाऊ खारोडेमहिलाध्यक्षा सौ अरुणाताई काकड यांच्या मार्गदर्शनात थेट तेल्हारा तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार साहेब यांना भेटून चर्चा केली व वरील विषय सविस्तर निवेदनाद्वारे कळविला यावेळी नंदकिशोर ठाकूर तालुका सचिव गणेश भाऊ सोनटक्के उपस्थित होते



