पिंप्री गवळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य़ पद प्रकरण

पिंप्री गवळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य़ पद प्रकरण
स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेअपर आयुक्त़ अमरावती यांचे आदेशाला ग्रामविकास मंत्र्यांची स्थ़गिती.शिवसेनेच्या वरीष्ठ़ नेत्यांनी शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र बघे यांची विश्वासहार्यता तपासून बघावी- सिमा इंगळे सरपंच पिंप्री गवळीखामगांव – मौजे पिंप्री गवळी ता.खामगांव येथील सौ सीमा राजेंद्र इंगळे सरपंच, सौ मुक्ता चेतन फुंडकर उपसरपंच व सौ उज्वला गजानन भोंबळे यांचेवर शासन परिपत्रकातील सुचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत अपात्रतेचे आदेश अपर आयुक्त़ अमरावती यांनी दिले होते. याबाबत उपरोक्त़ तिन्ही सदस्यांनी मा.ना.गिरीषजी महाजन यांच्याकडे अपील दाखल केली असता सदरच्या आदेशाला स्थ़गिती देण्यात आली आहे. अपर आयुक्त़ अमरावती यांनी मौजे पिंप्री गवळी ता.खामगांव यांचेवर शासन परिपत्रकातील सुचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत दि.20/07/2023 रोजी आदेश पारित केला. परंतु सदर आदेशाला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य़ यांनी मा. ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दि.25/07/2023 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.03) कलम 39 (3) अन्वये अपिल दाखल केले. मौजे पिंप्री गवळी येथील विरोधकांना निवडणुकीत पराभव केल्यावर राजेंद्र बघे यांनी विविध पाटर्यांमध्ये प्रवेश करुन राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्ऩ केला. राजेंद्र बघे हे ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव पचवु न शकल्यामुळे त्यांनी मागील झाल्यापासून उपरोक्त़ ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांच्या विरुध्द़ सतत तक्रारी केल्या परंतु या सर्व खोटया तक्रारी खारीज करण्यात आल्या. उपरोक्त़ ग्रामपंचायत तक्रारीबाबत देखील त्यांनी राजकीय दबाव टाकण्यासाठी आधी काँग्रेसचा वापर केला पंरतु त्यात त्यांना फायदा होईल् असे न दिसल्यामुळे त्यांनी मा.ना.श्री बच्चु कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला. तेव्हा देखील त्यांच्याकडून राजकीय दबावाचा प्रयत्ऩ केला परंतु अधिकारी त्या दबावाला बळी पडले नाही. ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे अहवाल वस्तुनिष्ठ़ व सत्य़परीस्थितीवर अवलंबून असतांना देखील जि.प.मुख्याधिकारी यांच्याकडील सुनावणी दरम्यान राजेंद्र बघे यांनी शिवसेने प्रवेश केला त्यातही बघे आधी उध्दव़ ठाकरे गटात होते. परंतु राज्यात सत्ता बदल होताच त्यांनी मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेने प्रवेश घेतला. उपरोक्त़ ठिकाणी आमच्या विरुध्द़ केवळ राजकीय दबावातून निकाल देण्यात आल्याचे सरपंच सिमा राजेंद्र इंगळे यांनी म्हटले आहे. भास्क़र बबन इंगळे हे केवळ मोहरा असून या तक्रारी मागे राजेंद्र बघे हे आहेत. राजेंद्र बघे हे ग्रामपंचायत निवडणुक, ग्रामसेवा सोसायटी या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले त्यांचा सुपडा साफ झालामुळे वैफल्यग्रस्त़ झाले आहेत. शिवसेनेच्या वरीष्ठ़ नेत्यांनी त्यांच्या भपकेबाजवर भाळून जाऊ नये आज ते शुन्य़ आहेत . शिवसेनेने त्यांच्यावर किती शक्ती खर्च करावी हा देखील शिवसेनच्या वरीष्ठ़ नेत्यांनी विचार करावा, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी देखील याबाबत वरीष्ठांना वस्तुस्थितीशी अवगत करावे. ते जरी आज शिवसेना तालुकाध्यक्ष असले तरी उद्या कोणत्या पक्षात जातील हे कोणीही सांगू शकत नाही, असेही सरपंच सिमा इंगळे म्हणाल्या. आम्ही राजेंद्र बघेचा निवडणुकीत पराभव केला त्यांनी तो स्विकारायला हवा. परंतु वैफल्यातून ते सतत खोटे आरोप, खोटया तक्रारी करीत आहेत. अखेर सत्याचाच विजय होईल. आम्ही भाजपाचे एकनिष्ठ़ आहोत सदैव राहु परंतु शिवसेनेच्या वरीष्ठांनी राजेंद्र बघे यांची विश्वासहार्यता तपासून बघावी ही विंनती.



