सराफांना लुटणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी उल्हासनगर मधून अटक.

सराफांना लुटणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी उल्हासनगर मधून अटक.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर कल्याण, उल्हासनगर मधीस सराफांच्या दुकानात ग्राहक म्हणून जाऊन दुकान मालकाची नजर चुकवून सोने, चांदीचा ऐवज चोरुन नेणाऱ्या उल्हासनगर मधील दोन महिलांना येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.निशा अशोक पुनवानी (३५), रेश्मा अशोक पुनवानी (३६) असे अटक करण्यात आलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत. या महिलांकडून चोरीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत ५६ हजार रुपये आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात कल्याण मधील शिवाजी चौकातील विमल शंकलेशा यांच्या मालकीच्या जवाहिऱ्याच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी मालक, कामगाराची नजर चुकवून सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या.चोरट्या महिला दुकानातून निघून गेल्यावर कामगाराला ग्राहक महिलेला दाखविलेल्या सोन्याच्या अंगठ्या आढळून आल्या नाहीत. दुकानात, मंचकाखाली शोध घेतला. त्या आढळून आल्या नाहीत. दुकानातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. तेव्हा त्या दोघींनी ती चोरी केली हे निस्पन्न झाले. 🖋️



