सामाजिकसांस्कृतिक

आण्णाभाऊ

आण्णाभाऊ….🙏
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
” 1 ऑगस्ट 1920 साली आण्णा भाऊंचा जन्म झाला. फक्त दिड दिवस शाळेत गेलेले आण्णा भाऊ मुंबईच्या रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या वाचून ख-या अर्थाने सुशिक्षित झाले. वयाच्या फक्त दहाव्या वर्षी आण्णा भाऊ साठे आणि त्यांच्या परिवाराला वाटेगाव वरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा जवळपास तीन चारशे किलोमीटरचा प्रवास अण्णा भाऊंनी त्यांच्या परिवारासह पायी केला. वाटेत उदरनिर्वाहासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला अनेक प्रकारचे कामे करतच त्यांनी मुंबई गाठली. ज्या आण्णा भाऊंना वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्याच आण्णा भाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान केला.
एक काळ असा होता की पश्चिम महाराष्ट्रातील घरा घरातील माणूस मुंबईला गिरणी कामगार होता, ऐन उमेदित कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दुर राहणा-या त्या काळातील गिरणी कामगाराच्या मनाची घालमेल आण्णांनी ” माझी मैना गावावर राहिली…,माझ्या जीवाची होतीया कायली…!
या अजरामर कलाकृतीत अगदी अचूक टिपली आहे..
लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button