साखरखेर्डा (ता.सिंदखेडराजा) येथे काल कृषियोद्धास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे

फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून शेतकरी बांधवांना संबोधित केले. यावेळी मंचावर माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हिवरागडलिंग या छोट्याशा गावातील ज्ञानेश्वर खरात-पाटील यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतही आपले बीएससी अॅग्रिकल्चरचे शिक्षण पूर्ण केले. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत Dnyaneshwar Kharat Patil या नावाने YouTube चॅनल सुरू केले. त्या चॅनलवर त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करत यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा जगासमोर आणल्या. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील असे अनेक व्हिडिओ त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केले. ज्याचा लाखों शेतकऱ्यांना फायदा झाला. आज त्यांच्या या YouTube चॅनलला १ लाख Subscribers पूर्ण झाले आहेत.
यानिमित्त आयोजित कृषीयोद्धा सन्मान सोहळ्यात राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील शेतीसंबंधी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणे गरजेचे आहे. जे विकते तेच पिकविण्याकडे भर देणे आवश्यक आहे. तसेच तरुण पिढीने शेतमालावरील प्रोसेसिंगवर आधारित उद्योगाकडे वळावे, असे मत यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना व्यक्त केले.



