
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मागणीवर प्रधान सचीवांचे चौकशीचे आदेश
निम्ऩ ज्ञानगंगा- 2 बृहत लघु पाटबंधारे येाजना ता.खामगांव जि.बुलढाणा या प्रकल्पास मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 167 कोटी रु.मान्यता देऊन सदर धरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. परंतु आजुबाजुच्या गावातील तसेच रोहणा गावातील काही शेतकऱ्यांनी सदर भिंती मधून पाणी झीरपत असल्याची तक्रार आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्याकडे केली याबाबत त्यांनी मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तक्रार करुन चौकशी करण्याची मागणी केली.
खामगांव मतदार संघातील निम्नज्ञानगंगा प्रकल्पाचे काम पुर्ण झाले परंतु या प्रकल्पाच्या भिंतीतून पाणी झिरपत असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्याकडे केली. यावर आमदार फुंडकरांनी मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे तक्रार करुन गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीवर मा. प्रधान सचीव यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये तत्कालील कार्यकारी अभियंता, उपकार्याकरी अभीयंता, कनिष्ठ़ अभियंता या सर्वांची चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार आहे.
उपरोक्त़ शेतातील पिकाचे दरवर्षी नुकसान होत असल्याबाबत त्योनी वारंवार कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, बुलढाणा यांच्याकडे व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार देखील केल्या होत्या. सदरची भिंत तयार करीत असतांना धरणाच्या भिंतीसाठी पाया खोदण्याची आवश्यकता होती परंतु काही भागात अशा प्रकारे पाया खोदलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे, त्यामुळे धरण 100 टक्के भरल्यावर या धरणातील पाणी भिंती खालून पाझरुन शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अशा निकृष्ठ़ दर्जाच्या कामामुळे उपरोक्त़ धरणाची भिंत फुटून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. सर्व बाबी लक्षात घेता व शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीत सत्यता जाणवत असल्यामुळे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. यावर तात्काळ कार्यवाही करीत प्रधान सचीव यांनी गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.



