उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय विभाग बुलढाणा (आरटीओ) विभागात दलालांचा सुळसुळाट…

*ब्रेकिंग…..*बुलढाणा:- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय विभाग बुलढाणा (आरटीओ) विभागात दलालांचा सुळसुळाट… गाडी नावावर करणे, लायसन्स काढणे, किंवा नवीन गाडी पासिंग करणे याकरिता सही मारणाऱ्या अधिकाऱ्यांचे ठरले आहे रेटकार्ड.. एका चारचाकी वाहनसाठी 500 तर दुचाकीसाठी 300.. तर किती सह्या झाल्या किती रक्कम घ्यायची यासाठी अधिकाऱ्यांचे ठरले आहे रिमार्क (खुण )… यामधे कोणता अधिकारी वाहनानुसर गोल राऊंड तर कोणता अधिकारी तीन टिक अशी खूण करतो… त्या नुसार किती सह्या झाल्या, किती रक्कम झाली याचा हिशोब लागतो..त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही.. दलालामार्फत गेले तर नागरिकांची कामे तात्काळ होतात नाहीतर कामे होत नाही अशी ओरड आहे. सदर प्रकार एका दलालासोबत बोलताना उघडकीस आला.. प्रत्येक कामासाठी साहेब पैसे घेतात.. असे म्हणणे आहे…ह्या प्रकाराकडे वरिष्ठ अनभिज्ञ आहे की त्यांच्या मुकसंमतीने होत आहे का? याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकप्रिनिधींनी लक्ष देवून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी होत आहे.



