महाराष्ट्रविदर्भ

दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत द्या; आ अँड फुंडकरांची विधानसभेत मागणी खामगाव::-

  स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे, या शेतकऱ्यांना मदत घ्यावी अशी मागणी आ अँड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत केली आहे.                   पावसाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानिवर चर्चेत आ अँड फुंडकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विषय मांडला. खामगाव मतदार संघासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे राहिलेले पीक वाहून गेले. बहुतांश शेतकय्रांना दुबार पेरणी करायची वेळ आली आहे. अजूनही अतिवृष्टी सुरूच असल्याने काही ठिकाणी तर दुबार पेरणी केलेले पिकसुद्धा वाया गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तिसऱ्यांदा पेरण्याचे संकट आले आहे. काही ठिकाणी कपाशी वर लाल्या रोग आल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठया संकटात असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी विधानसभा सभागृहात आ अँड आकाश फुंडकर यांनी सरकार कडे केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button