गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

शेगाव मटन मार्केट मध्ये युवकाचा खून

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव, दि. २५ शेगाव शहरातील मटन मार्केट परिसरात आज दुपारी झालेल्या पक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गर्दीच्या बाजारपेठेत काही व्यक्तीमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या दरम्यान नितीन गायकवाड (वय ३५, रा. तीन पुतळा परिसर, शेगाव) या युवकावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने अचानक नितीनवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलविले, मात्र
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे
स्वच्छ
वातावरण निर्माण झाले असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण
पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच शेगाव
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मटन मार्केट परिसरात तपास सुरू करून साक्षीदारांची चौकशी केली आहे. खूनाचा नेमका हेतू अद्याप समजू शकलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू केला असून, काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान, दिवसाढवळ्या शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button