Uncategorized

तेल्हारा येथील गुरुमाऊली परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांकरिता तब्बल 40000 हजार रुपय…

तेल्हारा:दि16.तेल्हारा येथील गुरुमाऊली परिवारातर्फे रविवार दिनांक १६ जुलै रोजी तेल्हारा पंचायत समिती मधील करीरूपागड आणि नवी तलई या दोन आदिवासी शाळा मधील इयत्ता १ली ते ५ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना तब्बल ४००००/रुपया चे चांगल्या प्रतीचे दप्तरासह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गुरुमाऊली नावाचा परिवार हा तेल्हारा येथील सुमारे 25 शिक्षकांचा एक समुह असुन.त्या समुहातर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रमा अंतर्गत आदिवासी भागात शैक्षणिक साहित्य वाटप आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात येत असते. यापासूनप्रेरणा घेऊन यावर्षी श्री शुभम शं.बाहकर(तहसीलदार गोंडपिंपरी), श्री राजेंद्रजी चोपडे (रा.कल्याण), श्री. दर्शनजी राठी, तेल्हारा
या सर्व मान्यवराकडून भरपूरआर्थिक मदत प्राप्त झाली.
शैक्षणिक साहित्य प्रत्यक्ष शाळेवर जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी गुरुमाऊली परिवाराचे अध्यक्ष श्री शंकरराव बाहकर, सदस्य श्री रवींद्र वासनकर श्री विशाल घोगले श्री मंगेश धनभर ,श्री अनिल बिहाडे ,श्री राहुल अवताडे श्री अनंतकुमार तायडे, श्री विलास घोडेस्वार ,श्री कपिल इंगळे ,श्री ज्ञानेश खापरकर श्री गणेश राजनकर,. श्री निलेश कोल्हे , श्री मयूर यादगिरे, श्री पांडुरंग डाबेराव श्री वैभव देऊळकर (सचिव), श्री अनुप उंबरकार,श्री आशिष सदाफळे , श्री दिलीप डाबेराव,श्री कीर्ती कुमार मुंडे ,श्री विशाल नागले, श्री सचिन ठोंबरे ,श्री प्रफुल इंगळे. श्री ओमप्रकाश उगले या सर्वांसह वरील दोन्ही शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button