जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार.

अकोला जिल्हा पत्रकार संघाचा उपक्रम.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
अकोला- दि.8
83 वर्षाची परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषद संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता स्थनिक पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सांस्कृतिक सभागृहात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील पत्रकार पाल्यांसह तेल्हारा तालुक्यातील दैनिक देशोन्नती शहर प्रतिनिधी अनिल अवताडे यांचे चिरंजीव सुजल अनिल अवताडे, दैनिक सकाळ प्रतिनिधी धर्मेश चौधरी यांची मुलगी तेजश्री धर्मेश चौधरी, दानापूर येथील दिवंगत पत्रकार पुंडलीकराव घायल यांचे नातू आर्यन विनय घायल या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच सहकार क्षेत्रात निवडुन आलेले पत्रकार संघाचे पदाधिकारी अनंतराव अहेरकर तसेच सदानंद खारोडे यांच्या पत्नी वैशाली ताई खारोडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्याला अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा, जिल्हाध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोदजी लाजुरकर, विज वितरण चे पिआरओ फुलसिंग राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून तर तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे, कार्याध्यक्ष तथा जिल्हा सह चिटणीस सत्यशील प्रभाकरराव सावरकर, सदानंद खारोडे, अनिल अवताडे इत्यादी उपस्थित होते.✍️



