ग्रामीण भागात हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा*

*ग्रामीण भागात हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा*
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी*
*अजय गायकवाड*
वाशिम /मालेगाव :- ग्रामीण भागातील हागणदरीमुक्त योजनेचा झाल्याचे दिसुन येत असुन याचा त्रास गावकरी मंडळीना होतो आहे . शासन शौचालय बांधकामासाठी अनुदान देते, मात्र अनुदान लाभार्थी व कर्मचाऱ्याकडून हडप करण्यात येते . त्यामुळे ग्रामीण भागात उघड्यावर घाणीची दुर्गंधी वाढते या दुर्गंधीमुळे रोगराई वाढुन डायरिया, चिकनगुनिया , मलेरिया व डेंग्यूसारखे आजारात ग्रामीण भागात वाढ झालेली दिसुन येत आहे .
शासनाने स्वच्छ भारत ,स्वच्छ गाव योजना राबविण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच शौचालय बांधकामासाठी अनुदान सुध्दा दिले जाते. परंतू उघड्यावर शौचास बसणाऱ्याची संख्खा अजुन कमी झालेली नाही. ग्रामीण भागात १०० गाव हागणदरीमुक्त गाव झाल्याचे फलक गावागावात पहावयास मिळते. मात्र शासनाच्या अनुदानाला चुना लावुन अनेकांच्या घरी कागदोपत्री शौचालय असल्याने हगणदरीमुक्त योजनाचा बोरबाजा उडाला आहे .



