कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्यांनाच संधी दया : गोपाल तायडे.

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) राज्या समेत बुलढाणा जिल्यातील दहा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका येत्या 28 एप्रिल ला होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील समावेश असून व्यापारी गट, हमाल मापारी गट, सोसायटी गट, ग्रामपंचायत गट मतदानाच्या हक्क बजावणार आहेत. दि.२७ नामनिर्देशन पत्र दाखल करणे.२८ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे.शेतकऱ्यांच्या शेतमाला बद्दल च्या समस्या तसेच सुविधा पुरवणीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम असते.कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांचा काही शेतीमाल हा हमी भावाच्या कक्षेत येत नाही.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने लढत आहे प्रयत्न करीत आहे. दर पंचवर्षिक प्रमाणे यंदा ही कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडुंका होणार आहेत.परंतु निवडणुकीचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो.हे महत्वाचे आहे. हेही लक्षात घ्यावं लागेल.कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून येणारे सदस्य शेतकऱ्यांच्या शेती मालाला वाढीव भाव मिळावा करिता आवाज उठवीतात का.? शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्या बद्दल काही ठोस असे पावले उचलतात का.? हे ही प्रश्न आहेत. कारण यंदा शेतकऱ्यांच पांढरे सोन (कापूस ) भावा आभावी कित्तेक दिवस घरात पडून होत. सोयाबीन, तूर. मुंग, उळीद मका.हरबारा. अश्या अनेक मालाची ची हीच गत होती. शेतकऱ्यांच सोयाबीन बाजारात आल कि. शासन सोयाबीन आयात करते. असे अनेक पिका संदर्भात होते. त्या मुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य असा भाव मिळत नाही.शेतकऱ्यांच्या शेती मालाच्या संदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या विषयाची प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवार कृषि उत्पन्न बाजार समिती सुभागृहात जाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची जाण असलेला उमेदवार निवडून येत असेल तर ते उमेदवार अश्या परिस्तिथीत शेतकऱ्यांचे अळचणी मांडू शकतो.त्या मुळे येत्या कृषि उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जान असलेले उमेदवार असने आवश्यक आहे. अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी प्रसार मध्यमाशी बोलताना वेक्त केली.



