वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव

**( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )
आपणास जय भिम, जय शिवराय, आपणास या माहितीद्वारे सूचित करण्यात येते की दिनांक 09-04-2023 रोजी विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळी वारा व पाऊस, गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना राज्य शासनाने एक लाख रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी दिनांक 11-4-2023 रोजी मंगळवारला 1:30 वाजता तहसील कार्यालय शेगाव येथे न चुकता हजर राहावे ही विनंती *आपले विनीत*शेगाव तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी, वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव, वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर ,वंचित बहुजन महिला आघाडी तालुका शेगाव, वंचित बहुजन महिला आघाडी शेगाव शहर, वंचित बहुजन युवा आघाडी तालुका शेगाव, वंचित बहुजन युवा आघाडी शेगाव शहर, सर्व वंचित बहुजन आघाडी ग्राम शाखा अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी तथा शेतकरी बांधवांनी निवेदन देण्यासाठी हजर राहावे.
आपला विश्वासु,
दा. भि. अंभोरे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष शेगाव



