बुलढाणामहाराष्ट्र

सावखेड भोई मध्ये रस्त्याच्या प्रश्नावर उपोषण.

सावखेड भोई मध्ये रस्त्याच्या प्रश्नावर उपोषण.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी. प्र. ता. गजानन खिल्लारे.

देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मौजे सावखेड भोई येथील लघु पाटबंधारे तलावाच्या डाव्या कालव्यातील हेड ते बायपास मार्ग खुला करण्याची मागणी करत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आजपासून मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालय देऊळगाव राजा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी गेल्या काही महिन्यापासून अनेक वेळा अर्ज , निवेदन आणि भेटी घेतल्या होत्या 2 जून 2025 रोजी विभागाकडून रस्ता खुला करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र पाच महिन्याहून अधिक काळ उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. गावातील प्रमुख नागरिक, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत. व देऊळगाव महीचे शेतकरी नेते जुल्फेकार भैय्या यांनी सुद्धा उपोषण स्थळी भेट दिली. या आंदोलन संदर्भातील निवेदनाची प्रत मा. आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात पाठविण्यात आली आहे. हा रस्ता विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करून न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button