बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. 27 : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विशेष माहिती नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अथवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असतील किंवा त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण अथवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि उपलब्ध असल्यास कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूकपणे नमूद करावा. तसेच, नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे तात्काळ संपर्क साधावा.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, बुलढाणा : ०७२६२-२४२६८३
पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०
टोल फ्री : १०७
मोबाईल : ७०२०४३५९५४

नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता उपलब्ध अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदवून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button