‘हर हर महादेव’च्या गर्जनेत श्री दुर्गामाता दौडला माळेगाव नगरीमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद

आवाज न्यायाचा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
गावातील तरुणांसह नारीशक्तीचा मोठा सहभाग
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने घटस्थापना ते दसरा या ९ दिवसाच्या कालावधीत दररोज पहाटे ५:३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे.रोज सकाळी माळेगावचे ग्रामदैवत साध्वी चंफा माता मंदिराजवळून श्री संत गजानन महाराज मंदिर, श्री संत गुलाब बाबा नवदुर्गा उत्सव मंडळ, महात्मा फुले नवदुर्गा उत्सव मंडळ, रामदेव बाबा मंदिर,राधा कृष्ण मंदिर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून शितला नवदुर्गा उत्सव मंडळ, शिवाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ, हनुमान मंदिरासमोरून, स्वराज महिला मंडळ, शेवट दुर्गा माता मंदिरामध्ये महाआरतीकरण्यात येत आहे.
देश, देव आणि धर्म’ या त्रिसूत्रा वर आधारित देशभक्तीपर गीते, भवानी मातेचा जयघोष आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण माळेगांव नगरी परिसर दुमदुमून गेला आहे.
दररोज पहाटे ठीक ५:३० वाजता गावाचे ग्रामदैवत साध्वी चंफा माता यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन स्थानिक मंदिरापासून या दौडला प्रारंभ केला जातो. गावातील प्रमुख मार्गांवरून फिरताना या दौडमध्ये गावातील तरुण, लहान मुले आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी (नारीशक्ती) अत्यंत भक्तीभावाने सहभागी होत आहेत.
दौडचा मार्ग विविध भागांतून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी दुर्गामातेचे भावपूर्ण दर्शन घेतले जाते. त्यानंतर ही दौड पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ एकत्र येते. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, सर्व धारकरी आणि नागरिक अत्यंत शिस्तीत व एकाग्रतेने ‘प्रेरणा मंत्रा’चे पठण करतात. या उपक्रमामुळे संपूर्ण गावामध्ये राष्ट्रभक्ती, धर्मसंस्कृती आणि तरुण पिढीमध्ये एकात्मतेचे एक नवीन चैतन्य निर्माण झाले आहे.



