बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

“तरुणाचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण?बावनबीर मधील घटने प्रकरणी सोनाळा पोलिसात गुन्हा दाखल”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दी.१४/१०/२०२६.

संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथून 21 वर्षीय तरुण रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राहुल शंकर जंजाळ (वय 21) असे या बेबत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे एखाद्या अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, असा बळकट संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, मूळचा शेगाव तालुक्यातील अडसण येथील रहिवासी असलेला राहूल जंजाळ हा सध्या बावनबीर येथे राहत होता. 11 ऑक्टोंबर 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तो अचानक कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाला.
राहुलचा सर्वत्र शोध घेऊ नये कुठेच मिळून आल्याने, अखेर त्याचा मामा दत्तात्रय प्रल्हाद कुकडे (वय 50.रा. बावनबीर) यांनी सोनाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली, राहुल चे कोणा अज्ञात व्यक्तीने फूस लावून किंवा बळजबरीने अपहरण केले असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यावरून सोनाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता(BNS),२०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

बेपत्ता तरुणाचे वर्णन:
*नाव: राहुल शंकर जंजाळ (वय 21 वर्षे)
*उंची: अंदाजे ६ फूट, शरीर यष्टि सडपातळ.
*केस: काळे, रंग: सावळा-निमगोरा
शेवटचा पेहराव: बेपत्ता झाला तेव्हा त्याच्या अंगात चॉकलेटी रंगाचा चौकडीचा (चेकचा) शर्ट आणि मिलिटरी रंगाची पॅन्ट होती. तसेच पायात चप्पल किंवा बूट नव्हते.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:
या वर्णनाचा तरुण आपल्या परिसरात कुठेही आढळून आल्यास किंवा या घटनेबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याची किंवा सोनाळा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदीप काळे यांनी केले आहे……..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button