बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा ऐतिहासिक विजय; आमदार मनोज कायंदे यांच्याकडून मुंबईत सदिच्छा भेट व अभिनंदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

सिंदखेड राजा:बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेत्या आदरणीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २१-०० असा निर्विवाद आणि ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या दैदीप्यमान विजयाबद्दल सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी आज मुंबई येथे सुनेत्राताई पवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सहकार क्षेत्रात निर्माण केलेला विश्वास, कणखर नेतृत्व आणि विकासाचा वारसा या विजयातून पुन्हा एकदा राज्यासमोर अधोरेखित झाला आहे. बारामतीप्रमाणेच सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही अजितदादांच्या विचारांचा आणि जनहिताच्या कार्याचा प्रभाव आजही कायम असल्याचे या एकतर्फी निकालातून स्पष्ट दिसून येते, अशा भावना आमदार मनोज कायंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्वर्गीय अजितदादांच्या विचारांचा आणि विकासाभिमुख कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी वर्तवला.

या महत्त्वपूर्ण सदिच्छा भेटीप्रसंगी आमदार कायंदे यांच्यासोबत आमदार शेखर निकम, आमदार दिलीप काका बनकर, आमदार राजू भैय्या नवघरे, आमदार राजेशदादा विटेकर आणि आमदार विजय राजे पंडित यांच्यासह अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सर्वच आमदारांनी सुनेत्राताई पवार यांचे अभिनंदन करत या विजयाचा आनंद साजरा केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button