संग्रामपूर तालुक्यातील वीर जवान स्व. श्रीकांत गिऱ्हे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर (वकाना) दि.१४/१०२६ सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील वकांना येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी आर पी एफ) वीर जवान स्व. श्रीकांत गिऱ्हे यांच्यावर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासकीय इथं मामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी उपस्थित राहून श्रीकांत गिऱ्हे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
देशसेवेचे व्रत स्वीकारून या मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या जवानाला अखेरचा निरोप देत असताना वातावरण शोकाकुल झाले होते. श्रीकांत गिऱ्हे या वीर जवानाच्या अंत्यसंस्कारानंतर डॉ. कुटे यांनी शोकाकुल गिऱ्हे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या अत्यंत दुःखद अशा प्रसंगी गिऱ्हे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
या भारत देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित जवानांचे योगदान अतुलनीय अशा प्रकारचे असून स्व श्रीकांत गिरे यांच्या देशसेवेची भावना सदैव स्मरणात राहील. संपूर्ण समाज त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे.



