बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जळगाव (जामोद) काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी चे राष्ट्रपतींना निवेदन सादर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

जळगाव (जामोद) दि.१४/२०/२६ सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद येथील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या तातडीच्या राजीनामाचे मागणी जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सखोल मतदार पुनरीक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष व नियमानुसार राबवली गेली पाहिजे, तसेच निवडणूक आयोगाची घटनात्मक स्वायत्तता कायम राखावी अशी मागणी भारताच्या राष्ट्रपतींना जळगाव जामोद येथील काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
जळगाव जामोद काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ऍड. भाऊराव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेस पक्षनेत्या स्वाती ताई वाकेकर, पंचायत राज विभागाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर, तालुका अध्यक्ष ऍड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष एड. अमर पाचपोर ,राजीव घुटे, विलास भारसाकळे, राजीव कुरेशी, अच्छे खा पठाण, अजहर देशमुख ,हुसेन राही, अर्जुन घोलप , आयाज शेठ, तुकाराम गटमने, शंकर मस्के, जुनेद शेख, संतोष गावंडे ,श्रीकृष्ण केदार, देविदास सावरकर ,प्रभुदास बोंबटकर ,एड. रतन इंगळे, अजयसिंह राजपूत, प्रेम कुमार जयस्वाल ,आणि नगरसेविका वैशाली तायडे ,निलेश तायडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button