बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली बसस्थानकाजवळ सातबारा ऑनलाइन सेंटरला भीषण आग; दुकान जळून खाकशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; शेजारील दुकानांचेही नुकसान, जीवितहानी नाही

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
आवाज न्यायाचा
चिखली. तालुका. प्रतिनिधी
अरुणा दतात्रय खंडागळे

चिखली : चिखली बसस्थानकाजवळ असलेल्या सागर वाघ यांच्या सातबारा ऑनलाइन कॉम्प्युटर सेंटरला मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. आगीमुळे शेजारील दुकानांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेत सागर वाघ यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, शेजारील दुकानांनाही आगीची झळ बसली. दरम्यान, आग आटोक्यात आली असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button