बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बावनबीर येथे काठी व लोखंडी गजाने मारहाण; सहा जणांविरुद्ध सोनाळा पोलिसांत गुन्हा

संग्रामपूर : तालुक्यातील बावनबीर येथे घरासमोर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, राजीकोद्दीन रियाजोद्दीन मिर्झा (वय ४७, रा. बावनबीर) यांच्या घरासमोर आरोपींनी कथितरित्या गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर काठीने डोक्यात मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा रफिकोद्दीन याच्या डाव्या हातावर लोखंडी गजाने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.याशिवाय फिर्यादीची पत्नी खालेदा बी आणि बहिण शमाबी यांनाही चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी इकबाल शेख नबु, शेख अफजल शेख बिस्मील्ला, शेख बिस्मील्ला शेख इब्राहिम, शेख सिराज शेख बिस्मील्ला, नाहिद परविन शेख इक्बाल आणि शकिलाबी शेख बिस्मील्ला, सर्व रा. बावनबीर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनाळा पोलिसांनी भा.न्या.सं. २०२३ मधील कलम 118(1), 115(2), 351(2), 351(3), 352, 189(1)(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा क्र. 279/2026 दाखल केला आहे.पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि संदिप काळे यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास पोहेकॉ विनोद राठोड (ब.नं. 2048) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button