छञपती श्री . शिवाजी महाराज न.प. हायस्कुल ची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विघमाने जिल्हास्तरीय फ्रिस्टाईल व ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धा दि. 26 ते 27 सप्टेंबर 2026 रोजी मेहकर येते सुरु असुन त्यामध्ये स्थानिक छञपती श्री .शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू रूषिकेश सखाराम विघाते यानी फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात दमदार कामगिरी करत.
17 वर्षे वयोगटात . 65 किलो वजन गटात जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केला असुन त्याची अमरावती येते होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल.
नगर परिषद देऊळगांव राजाचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मा. अरूणजी मोकळ साहेब . व शाळेचे प्राचार्य संजयराव देशमुख सर ,तसेच क्रीडा संयोजक राजेश सपाटे सर ,नरेंद्र शर्मा सर प्रा. पैठणे सर . संजय मगर सर ,व शिक्षकवृंद यांनी क्रीडा प्रशिक्षक अनिल दंदाले सर व विजयी खेळाडूचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. व विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .



