मनरेगाच्या जाचक अटी विरोधात संग्रामपूर संताप:शासन निर्णयाची संघटनेतर्फे केली होळी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
२७/९/२०२६.
शासनाने मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीबाबत काढलेल्या नवीन शासन निर्णयातील जाचक अटीचा निषेध करण्यासाठी संग्रामपूर येथील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालय समोर या जाचक निर्णय याची (जी . आर ) जाहीर होळी करण्यात आली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोंबर पासून राज्य व्यापी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील मनरेगाची कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२ ऑक्टोंबर पासून काम बंद का?
ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. गेल्या दोन वर्षापासून ग्राम रोजगार सहायकाचे मानधन प्रलंबित आहे. या प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊन तुला तोडगा काढणे ऐवजी शासनाने एक ऑक्टोंबर च्या शासन निर्णयाद्वारे नवीन जाचक अटी लादल्या आहे. त्यामुळे राज्यातील ग्राम रोजगार सहायकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शासनाने तातडीने यावर निर्णय न घेतल्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांची कामे बंद पडली जातील.
अपुऱ्या मानधनात कामाचा प्रचंड ताण:
मनरेगा योजनेची ग्रामपंचायत यशस्वी अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी राम रोजगार सहायतावर असते. गावात मोठ्या प्रमाणावर मनुष्य दिवस निर्माण करण्यासोबतच लाभार्थ्यांचे केवायसी करणे, बँक खाते आधारशी लिंक करणे, विविध मस्टर तयार करणे. आणि इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे अशी कामे त्यांना करावी लागतात. या कामासाठी त्यांना वारंवार स्वखर्चाने तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. या कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यंत अपुरे असून, तेही नियम मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कागदपत्राच्या त्रुटीमुळे विविध जबाबदाऱ्यावर कारवाईची तलवार असते. मात्र हक्काचे मानधन मिळत नसल्याने आधीच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
प्रशासनाला दिले निवेदन..
या आंदोलन दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत पाटील. गटविकास अधिकारी माधव पायघन. तालुका कृषी अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. शासनाने यावर तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मिटांगे. उपाध्यक्ष सुरज परघरमोर सचिव गजानन बामगे यांच्यासह तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



