बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महामनाची सावली-मी रमाई नाट्य प्रयोगाने बोडखा वाशियांचे डोळे पानावले; संबोधी रायपुरे यांचे बहारदार सादरीकरण.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दी.२१/९/२०२६.

बोडखा: स्थानिक युवा भीम क्रांती मंडळ व पंचशील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बोडखा गावातील महामानवाची सावली मी रमाई या विशेष एकपात्री नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाला परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी प्रचंड गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला.
हे एक पात्री नाटक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित होता. महामानवाच्या ऐतिहासिक आणि महान कार्य भागामागे सावली सारख्या खंबीर उभ्या राहणाऱ्या माता रमाई यांचे जीवन कार्य या प्रयोगातून जिवंत करण्यात आले. टीम परिवर्तनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. ॳ.प्रा.ए.एच. खंडेराव लिखित या नाटकाचे सादरीकरण आणि माता रमाई यांच्या वेशातील अभिनय कलाकार संबोधीशैलेंद्र रायपुरे यांनी केला.
आपल्या बहारदार आणि भावूक अभिनयाने संभाजी रायपुरे यांनी उपस्थित प्रेषकांच्या डोळ्यात अश्रू आणले. माता रमाईचा त्याग. त्यांचे कष्ट . आणि बाबासाहेबांना दिलेली साथ हुबेहूब रंगमंचावर उभी राहिल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्र मंडळ आणि पंचशील महिला मंडळ च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी गावातील आणि परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय भीम-नमो बुद्धाय-डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई यांचा विजय असो अशा जय घोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button