शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे — आ.श्वेता महाले पाटील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
“ छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार सदैव स्मरणात ठेऊनच देवाभाऊंचे सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.
चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे इसोली येथे गावकऱ्यांच्या पुढाकारातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व पूजनाचा मंगल सोहळा उत्साहात पार पडला.चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण व पूजन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी, युवक, महिला आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार पुढे नेत आजच्या काळात जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. विशेषतः सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्या-ज्या ठिकाणी पीक पाहणीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे व्यवस्थित आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देईल, असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे नमूद करत आमदार श्वेता महाले पाटील यांनी शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख केला. सिंचनाच्या माध्यमातून शेतीला स्थैर्य मिळावे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
इसोली येथील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम केवळ एका स्मारकाचे लोकार्पण न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाज आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याचा संकल्प अधोरेखित करणारा ठरला. यावेळी उपस्थित युवक आणि शिवप्रेमींच्या उत्साहामुळे कार्यक्रमाला विशेष वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय गाडेकर, श्री. बळीराम काळे, श्री. रामेश्वर कोकाटे, श्री. विनोद सीताफळे, श्री. शिवा भागवत, डॉ. राजेंद्र दिघे, श्री. राजू कोकाटे, श्री. माणिकराव कोकाटे, डॉ. रईस, श्री. राम शेळके, श्री. विशाल देशमुख, ज्येष्ठ मंडळीतील श्री. किसनमामा कोकाटे, श्री. बाळूभाऊ शेळके, श्री. रामेश्वर खपके, श्री. राजूभाऊ दिघे, सरपंच श्री. रईस माणिकराव खरात, श्री. लालाजी शेळके, श्री. दामू येवले, श्री. अनंता शेळके, श्री. सुनील शेळके, श्री. गोविंद येवले, श्री. देवानंद शेळके, श्री. महाराज श्याम शेळके, श्री. बाळू निकम, श्री. आत्माराम घनघाव, श्री. गणेश दिघे, श्री. प्रकाश लागे, श्री. प्रकाश येवले, श्री. बद्री येवले, श्री. ज्ञानेश्वर सीताफळे, श्री. शरद बाठे यांच्यासह शिवप्रेमी, युवकवर्ग, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..



