बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मारवाडी युवा मंचाच्या शिबिरात अनेकांनी केले रक्तदान. ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ संदेशाला प्रतिसाद !

स्वातंत्र्य दिनी शेगावकरांचे देशासाठी रक्तदान..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मारवाडी युवा मंच, शेगाव यांच्या वतीने शेगाव येथील सरकारी रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. “रक्तदान हे श्रेष्ठ दान” या संदेशासह राबवण्यात आलेल्या या शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वातंत्र्य दिनी देशासाठी रक्त देणे, हा संकल्प घेऊन आलेल्या रक्तदात्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरासाठी सौरभ सतीशजी गोयनका, आयुष मनीषजी अग्रवाल, अंकुश नंदकिशोरजी चांडक, आदित्य राजेशजी टिबडेवाल, जय वर्मा, निखिल राठी, प्रकाश वर्मा, चेतनजी शर्मा, शुभमजी शर्मा, आनंदजी शर्मा, सुनीता दिनेशजी बजाज, तुषार राजेशजी बजाज
यांच्यासह इतर अनेक दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष सौरभ गोयनका, सचिव प्रफुल्ल मुहाना, कोषाध्यक्ष राहुल अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोहित भूतडा व डॉ. भरत राठी यांनी पुढाकार घेऊन विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय सदस्य निखिल राठी, जय वर्मा, आदित्य टिबडेवाल, आयुष अग्रवाल व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे
मारवाडी युवा मंच
महत्त्व पटवून देत नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व रक्तदाते, सहकार्यकर्ते व सहभागी नागरिकांचे मारवाडी युवा मंचातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. आयोजकांनी यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button