अकोलाविदर्भ

‘दो बूंद जिंदगी की’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आरोग्य कर्मचाऱ्यांना आकाश दादा शिरसाट यांच्याकडून सेवा व सहकार्य

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

‘दो बूंद जिंदगी की’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आरोग्य कर्मचाऱ्यांना आकाश दादा शिरसाट यांच्याकडून सेवा व सहकार्यउप

प्रतिनिधी :राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अकोला शहरातील जुने शहर परिसरातील भीमनगर, रमाबाई चौक येथील बुद्ध विहारात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.भारताचा ‘पोलिओमुक्त देश’ हा मान कायम राखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच आशा सेविका मंदाताई पाटील यांनी विशेष परिश्रम घेत बालकांचे लसीकरण केले. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी परिसरात जनजागृती करून पालकांना केंद्रावर आणण्याचे कार्यही करण्यात आले.या सेवाभावी उपक्रमाला सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते आकाश (दादा) शिरसाट यांनी मोलाचे सहकार्य केले. लसीकरण मोहिमेदरम्यान दिवसभर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता, फळे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच बसण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात आली. आरोग्य सेविकांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.आकाश दादा शिरसाट यांनी सांगितले की, “बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभाग अहोरात्र मेहनत घेत आहे. अशा सेवाभावी कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक समाजबांधवाचे कर्तव्य आहे. पोलिओमुक्त भारताचा संकल्प अधिक बळकट करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अशा मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.”राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बालकांना कायमस्वरूपी अपंगत्वापासून संरक्षण मिळणार असून, समाजातील विविध घटकांच्या सहकार्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button