स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर
रावेर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीचे स्मरण करत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सौ कमलाबाई एस अगरवाल गर्ल्स हायस्कूल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय रावेर च्या परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘स्वातंत्र्याचा उत्सव आणि हिरवाईचा संकल्प’* या भावनेतून आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याबरोबरच देशाची नैसर्गिक संपदा जपणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता वृक्षलागवडीसोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी घेतलेला हा हिरवाईचा संकल्प पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला.
प्रसंगी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मिसर उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले चेअरमन संतोष शेठ अग्रवाल संचालक शैलेंद्र देशमुख , तुषार मानकर महेश अत्रे विजय शेठ लोहार , , उज्ज्वल अग्रवाल , मुख्याध्यापिका एच एस कोल्हे , उपमुख्याध्यापक आर एल तायडे , पर्यवेक्षक एम जी पाटील शिक्षक , शिक्षकेतर व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते



