खानदेशमहाराष्ट्रराजकीय

“विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेच्या रथास मंत्री श्री.गिरीषजी महाजन व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दाखविला हिरवा झेंडा…

भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या ३ रथास आज मंत्री श्री.गिरीषजी महाजन व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

भारत सरकार च्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जुन-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यांत आली असून, आज जळगांव जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ झाला.

यावेळी मंत्री श्री.गिरीषजी महाजन व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जळगांव जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिकेत पाटील, श्री.पद्माकर महाजन, श्री.वासुदेव नरवाडे, श्री.चंद्रकांत भोलाणे, श्री.विनोद पाटील, श्री.अंकुश चौधरी, श्री.अमित देशमुख, श्री.प्रविण खिरळकर ई. प्रमुख उपस्थितीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button