श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
हिवरखेड (वार्ताहर )
सौन्दळा येथील श्री शंकरराव पुंडकर विद्यालय व क. महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन व दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.सकाळी संपूर्ण गावातून शाळेच्या साडे चारशे विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्यदिन चिरायू होवो या घोषणेने परिसर दणाणून गेला. त्यानंतर शाळेत सुरुवातीला महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक महेंद्र कराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विध्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप खुपासे होते तर संस्थेचे अध्यक्ष शंकरराव पुंडकर गुरुजी, सचिव डॉ. प्रमोद अरबट, सदस्य रमेश पुंडकर गुरुजी, गजाननराव मिरगे, संजय भिसे, विलास पुंडकर, सरपंच विनोद मिरगे प्राचार्य रमेश ठाकरे, पोलीस पाटील राजेंद्र चणेकर, पत्रकार दिनेश लोहाना, दिपक सपकाळ यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन करून स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्यदिनाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेश टाले व शैलेश तराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुरुषोत्तम गाढे यांनी केले.



