बहुजन समाज पक्षाचा लोकशाही बळकटीकरणासाठी पुढाकार; बुलढाण्यात ८ ऑगस्ट रोजी भव्य प्रशिक्षण व प्रबोधन शिबिर……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- ६ ऑगस्ट २०२६
राजर्षी शाहू महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त BLA-2 प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवेरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती बहुजन समाज पक्ष, बुलढाणा जिल्हा युनिटच्या वतीने लोकशाही अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण तथा प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात BLA-2 (बूथ लेव्हल एजंट) यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, जबाबदार व जागरूक मतदारांच्या सहभागातून लोकशाही अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत गुरू रविदास सामाजिक भवन, तानाजी नगर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. दिलीप सरकटे अध्यक्षस्थानी राहणार असून, मा. विक्रांत जाधव (DMM, उमेद बुलढाणा), मा. पंडित बोर्डे (प्रदेश सचिव, बसपा) आणि मा. भीमसेन शिराळे (गटविकास अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमासाठी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवेरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, यशदा संस्थेचे वरिष्ठ प्रशिक्षक प्रा. संजय समदूर हेही प्रशिक्षणाद्वारे सहभागींचे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक प्रक्रिया, मतदानातील जनजागृती, बूथ व्यवस्थापन आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बहुजन समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे……✍️



