५ ऑगस्ट संघर्ष दिन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दिपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया पॅंथर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वकाना येथे शाळेतील मुलांना फराळ आणि फळांचे वाटप करण्यात आले…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- ६ ऑगस्ट २०२६
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नाईक दीपक भाई केदार गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड करून रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय विरुद्ध या मनुवादी व्यवस्थेविरोधात सातत्याने झुंज देत आहेत.त्यांचा संघर्ष हा अफाट आहे आम्हाला गर्व आहे की,आम्ही अशा लढवय्या नेत्याच्या छात्रशाया खाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. “आम्ही झगळतो आहोत ते इज्जती करीता त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे”. बाबासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष उभा करत आहे अशा या लढवय्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जि.प. प्राथमिक शाळा वकाना येथे शाळेतील १ ते ७ वी पर्यंतच्या मुलांना फराळ आणि फळांचे वाटप ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष विजयभाई वानखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा अशा प्रकारचा संदेश त्यांनी पालकांना दिला आहे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या नाही तर गोरगरिबांचे मुलं इथून पुढे शिक्षण घेऊ शकणार नाही आणि म्हणून आपल्या मुलांना आपल्या गावच्या शाळेमध्येच टाकले पाहिजे कारण या मनुवादी व्यवस्थेने या देशातील ९२ हजार शाळा बंद केले आहेत ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. ह्या शाळा जर वाचवायच्या असेल तर आपल्या पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळे मध्येच टाकलं पाहिजे. अन्यथा हे मनुवादी शासन शिक्षणाचं शोषण करुन बाजारीकरण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी गावातील नागरिक व शिक्षक रुंद उपस्थित होते.
पँथर विजयभाई वानखडे
बुलढाणा जिल्हाध्यक्ष
ऑल इंडिया पॅंथर सेना…



