बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा!!!

 स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 


संग्रामपूर तालुका प्रतिनिधी ,

 रतन भगत. 

दि.२८/७/२६ जळगाव जामोद. सविस्तर वृत्त असे की भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या एकत्रित आरक्षणात अ ब क ड उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप करत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५८ जातींमधील नागरिकांनी काल दिनांक २७ जुलै रोजी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट असा मोर्चा काढला. अनुसूचित जाती व उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वात शहरातील भीम नगरामधून या मोर्चा सुरुवात झाली. अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने यावेळी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नमूद केले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित , पीडित आणि सामाजिक वर्णव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या ५९ जातींना एकत्र करून १३ टक्के आरक्षण दिले होते. परंतु काही लोकांच्या दबावामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवरेकरण करण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रातील ५९ जातींपैकी ५८ जातींचा उपवर्गीकरणास तीव्र विरोध असताना शासनाची ही गुप्तता संशयात पद आहे. असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. महाराष्ट्रातील ५९ जातील पैकी ५८ जातींचा उपयोग वर्गीकरणाला विरोध असल्याने हा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मोर्चामध्ये संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ५८ जातीमधील दीड हजाराहून अधिक महिला व पुरुष सहभागी झाले होते मोर्चादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर, विजय वानखडे, आशिष भाऊ धुंधाळे, सुनील बोदडे इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. सदर मोर्चामध्ये समता सैनिक दल यांनी दिलेले योगदान हे या कार्यक्रमाचे विशेष असे वैशिष्ट्य होते. सदर मोर्चा हा अत्यंत शांततेने पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button