बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
सोनाळा पोलीस स्टेशनचे मिशन परिवर्तन अंतर्गत दामिनी पथक सक्रिय.आदिवासी महाविद्यालय टूनकी येथे दामिनी पथकाची विद्यार्थ्यांनीत जनजागृती!!!

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस*
*संग्रामपुर तालुका प्रतिनिधी*
*रतन भगत*
दि.२८/७/२६ संग्रामपूर, सविस्तर वृत्त असे की, विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच महिला ह्या आजच्या युगामध्ये सुरक्षित कशा राहतील यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनात सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी मिशन परिवर्तन दामिनी पथक पोलीस महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. दामिनी पथक सक्रिय झाले असून मिशन परिवर्तन अंतर्गत दामिनी पथक पोलीस महिला आमदार आरती सावळे यांनी पथकातील आपल्या सहकाऱ्यांसह सोनाळा टूनकी बस स्टॅन्ड, शाळा परिसरात गस्त घालून परिसरातील ग्रामीण भागातील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, तसेच महिलांना तातडीने मदत करण्यासाठी तयार केलेले महिला पोलिसांचे मिशन परिवर्तन अंतर्गत दामिनी एक विशेष पथक आहे. दामिनी पथक शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी हे पथक सतत गस्त घालते. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यानिक असते. पॉक्सो, पोलीस भरती, डायल ११२, बालविवाह, अमली पदार्थ, व्यसनमुक्ती, व कायद्याविषयी जनजागृती करून मार्गदर्शन केले. दामिनी पथक महिला सुरक्षिततेसाठी असून महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या हेल्पलाइन नंबर वर किंवा तक्रारींवर हे पथक काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचून तात्काळ अशी मदत करते. शाळकरी मुली महिलांनी संकटकाळी गरजेप्रमाणे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी निर्भीडपणे गावातील सुज्ञ नागरिक, पोलीस कर्मचारी यांच्याकडे महिला सुरक्षा हेल्पलाइन नंबर किंवा सोनाळा पोलिसांसी संपर्क साधावा. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दामिनी पथक महिला अंमलदार आरती सावळे यांनी विद्यार्थिनींना दिले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार, पोलीस कॉन्स्टेबल सास्ते, पोलीस कॉन्स्टेबल इमरान व दामिनी पथक महिला पोलीस कर्मचारी व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



