लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला खपवून घेणार नाही; खासदार संजय दीना पाटील यांच्याविरोधात कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांबाबत कथितरीत्या अर्वाच्य भाषा वापरल्याच्या प्रकरणी खासदार संजय दीना पाटील यांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस शासकीय कारवाई झालेली नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान असून सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. अशा पत्रकारांचा अपमान करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात करण्यासारखे आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची असंसदीय व आक्षेपार्ह भाषा अपेक्षित नसून, या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच पत्रकारांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.यावेळी नितीन बळीराम गोसावी (विधानसभा क्षेत्र प्रमुख), ॲड. राहुल पाटील (तालुका प्रमुख), ॲड. देवेंद्र बोदडे (तालुका समन्वयक), वसीम पिंजारी (तालुका संघटक), ॲड. अशोक बोदडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



