बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तामगाव पो.स्टे.चे ठाणेदार सोनवणे यांची बदली

नवीन ठाणेदार म्हणून श्रीकांत निचळ रुजू

प्रतिनिधी. राजेंद्र मुंढे

तामगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांची पदोन्नती होऊन पोलिस उपअधीक्षक पदावर नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ यांची तामगाव पोलिस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शनिवार २७जून रोजी पदभार स्वीकारला.

जिल्ह्यातील तब्बल ५१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश २३ जून रोजी जारी करण्यात आले. या आदेशानुसार तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पो.नि. पंडितराव सोनवणे यांची पदोन्नती होऊन त्यांची नाशिक येथे उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी यापूर्वी तब्बल तेरा महीने जळगाव (जामोद) पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक

याच बदल्यांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांची शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारीपदी, पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे यांची जळगाव (जामोद) येथे, तर पोलिस उपनिरीक्षक विलास बोपटे यांची मलकापूर ग्रामीण

पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.

म्हणून कार्य केले असून, त्यानंतर त्यांची बुलडाणा येथे बदली झाली होती. आता जिल्हा अंतर्गत बदलीमुळे त्यांची तामगाव पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन प्रभारी ठाणेदार म्हणून श्रीकांत निचळ यांच्या नियुक्तीमुळे तामगाव पोलिस स्टेशनच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button