बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
प्रलंबित विकासकामांबाबत विद्याधरजी महाले साहेबांसोबत ग्रामस्थांची चर्चा

भारत लाईव्ह एक्सप्रेस न्युजप्रतिनिधी सलमान पठाण चिखली
सवना गावातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत आदरणीय विद्याधरजी महाले साहेब यांच्या समवेत समस्त गावकरी मंडळींनी चर्चा केली. गावातील रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये जल जीवन मिशनचे थांबलेले काम, स्मशानभूमीचा प्रश्न, गजानन महाराज मंदिर व महादेव मंदिरासाठी निधी, सिंगल फेज वीज लाईन, सवना-दिवठाणा रस्ता, नवीन ग्रामपंचायत इमारतीचे काम, गावातील अंतर्गत रस्ते आदी विषयांचा समावेश होता.
ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी विद्याधरजी महाले साहेब यांनी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.



