खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर हादरले! अपघातात पती-पत्नी ठार, एक वर्षाचे बाळ बचावले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

तालुक्यातील बेलसवाडी फाटा, मरिमाता मंदिराजवळ आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव आयशर गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

आज सकाळी घडलेल्या या भीषण अपघातातील मृतांमध्ये गजानन हिरामण पाटील व त्यांची पत्नी सौ. अश्वीनी गजानन पाटील समावेश असून ते रावेर तालुक्यातील कोचूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे दांपत्य आपल्या एक वर्षाच्या बाळासोबत द्वार दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघात अत्यंत भीषण असतानाही त्यांच्या सोबत असलेले लहान बाळ चमत्कारिकरित्या बचावले आहे.

दरम्यान, या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button