अकोलाबुलढाणाविदर्भ

हिवरखेड -तेल्हारा मार्गे अकोला बस सुरू कराअ. भा. ग्रा पत्रकार संघाची मागणी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा /अकोला जि. प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा -हिवरखेडच्या वतीने आज दि. २ मे २६ रोजी तेल्हारा बस आगार व्यवस्थापक मीथुन शर्मा यांना हिवरखेड- तेल्हारा मार्गे अकोला बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

आगर प्रमुख मिथून शर्मा यांनी हे निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

हिवरखेड अकोट मुख्य मार्गांचे काम सुरू असल्याने हिवरखेड अकोट मार्गे अकोला जाण्यास विलंब होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्काळ ही बस सकाळ दरम्यान तापमानाचा अंदाज पाहून सुरु करण्यात यावी ,अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे वरिष्ठ मनोहर सुने, कैलासबापू देशमुख, युसूफखान यांच्या मार्गदर्शनाखाली नाना इंगोले, धीरज बजाज, नंदकिशोर नागपुरे, राजपाल दामोदर, देवकीनंदन मथारिया, विजय घोडे, अर्जुन खिरोडकार, यांच्या स्वाक्षरीचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button