जि.प.प्रा.शाळा दापुरा येथे ‘जल दिनानिमित्त ‘जल शपथ’ व ‘निसर्ग पूरक होळी’ उत्सव आनंदात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
दापुरा दि.२४ : जि .प. प्राथमिक शाळा दापुरा येथे जल दिनानिमित्य जल शपथ व होळी उत्सवानिमित्त निसर्गपुरक होळी उत्सव शुक्रवार दि.२२ मार्च रोजी हे वरील दोन्ही कार्यक्रम आनंदात संपन्न झाले.
निसर्गातील जल श्रोत संपत असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यावरण पुरक होळीचे महत्व पटवून देवून मुलांकडुन चाकोऱ्या तयार करुन व सदर चाकोऱ्यांची सुंदर होळी सजवली त्या भोवती गाणे गावून विविध खेळ खेळले . कार्यक्रमाची सांगता होळी दहन न करता शेणाच्या चाकोऱ्या , शेंगोळ्या झाडांना समर्पित केल्या तर प्लॅष्टीकच्या पिशव्यांची होळी तयार करुन होळीदहन केले. पर्यावरण पुरक होळी ही काळाची गरज असून प्रत्येक सण हा आनंदाने साजरा करणे क्रमप्राप्त असले तरी सामाजिक भाण जपत उत्सव साजरे करूया असे ठरवत जलसंवर्धन प्रतिज्ञा घेण्यात आली.
मुख्याध्यापक मनोहरराव शेळके यांचे मार्गदर्शनात सतीष देशमुख , संघर्ष सावरकर, सौ अर्चना खिरोडकर , बळीराम भाऊ सातारकर, दिनकरराव सातारकर श्रीमती शारदा आढे, सौ इंदूबाई बचे , सौ स्नेहा बचे व सर्व विद्यार्थी यावेळी कार्यक्रमात सहभागी झाले होते
.
“आनंदाचा सण आनंदाने साजरा करू ,
पाणी अपव्यय टाळू,
व्यसनापासून दूर राहू “
अशी शपथ या वेळी घेण्यात आली.



